⚡वेंगुर्ले ता.१४-: डाॅ.श्रीनिवास गावडे मुले पळवणारी टोळी काय॔रत अशा बातम्या सोशल मिडीया व माध्यमातून येत असतात त्यामुळे पालकानी आपल्या पाल्या बाबत जागृत राहावे असे प्रतिपादन पोलिस शातंता समिती सदस्य डाॅ.श्रीनिवास गावडे यानी केले.
प्रा.शाळा दाभोसवाडा चा पारितोषिक वितरण काय॔क्रम नुकताच पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक श्रो.रघुवीर नळेकर भारतीय जवान श्री.चारूदत्त बटवलकर, सौ.स्वाती बिस्ता, सौ.आयेशा हुले, मुख्याध्यापिका सुजाता दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
काय॔क्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रसाद जाधव यानी केले. काय॔क्रमास मोठ्या संख्येने पालक वग॔ उपस्थित होता.
