लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम
⚡कणकवली ता.१३-: लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कणकवली व आयनल ग्रामपंचायत. यांच्या संयुक्त विद्यमाने आयनल गावठणवाडी येथे ३९० गुरांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी या जनावरांना लम्पी रोगाची लस देण्यात आली तसेच कॅल्शियम टॅानिकचे वाटप करण्यात आले
देशभरात लम्पी या गुरांना होणाऱ्या त्वचारोगाने थैमान घातले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या रोगामुळे हजारो गाईगुरे मृत्यूमुखी पडली आहेत. लम्पी हा संसर्गजन्य रोग असून तो एका जनावराकडून दुसऱ्या जनावराकडे झपाट्याने पसरतो त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कणकवली व आयनल ग्रामपंचायत. यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आयनल येथे १२ ॲाक्टेबर रोजी पशुधनाचे लसीकरण व कार्यमोहीम शिबीर मोफत आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील वाड्या वस्त्यांमध्ये फिरून ३९० गुरांचे लसीकरण करण्यात आले व शेतकरी बंधूना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गुरांना कॅल्शियम टॅानिकचे रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल मार्फत मोफत वाटप करण्यात आले या शिबिरासाठी पशुवैद्यकीय अधिकारी माजी रोटेरीयन डॅा. तुषार वेर्लेकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाची सुरुवात गोपुजन करून करण्यात आली. यावेळी या शिबिरात रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे असिस्टंट गव्हर्नर रो. दिपक बेलवलकर, प्रेसिडेंट रो. वर्षा बांदेकर, ट्रेझरर रो. माधवी मूरकर, रो. नितीन बांदेकर, रो. महेंद्र कुमार मुरकर, रो. सिताराम कुडतरकर, रो. भेहराराम राठोड, रो. तृप्ती कांबळे डॅा महेश चौगुले पशुघन विकास अधिकारी पंचायत समिती कणकवली, ए डी पालकर पशुधन विकास अधिकारी फिरता पशुवैद्यकीय दवाखाना कणकवली, पी के गाडेकर पशुघन पर्यवेक्षक, डी आर चव्हाण, अे जी साटम, एम डी सावंत,एम डी झेमणे, एन एम पालवे, के व्ही जाधव, एस एम मुळे, एम आर जोगळे, आयनल गावचे सरपंच बापू ज्ञा. फाटक, उपसरपंच लक्ष्मीकांत पेडणेकर, ग्रामसेवक व आयनल गावचे शेतकरी बंधू व ग्रामस्थ उपस्थित होते
या प्रसंगी आयनल गावातील ३९० गुरांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या शिबिरामुळे गाववासीयांनी रोटरीचे आभार मानले.
