⚡वेंगुर्ला ता.११-: विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी जिल्हा-हिगोली यांच्यातर्फे यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्र म्हणून काम करणारे पुरुष व महिला यांची निवड करून त्यांना द रियल हिरो व शूर तेजस्विनीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी तुळस गावचे सुपुत्र, सर्पमित्र तथा प्राणी मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुरक्तमित्र रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘द रियल हिरो‘ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ सर्पमित्रांचा समावेश होता.
महेश राऊळ यांनी सर्पमित्र म्हणून कार्यरत असतानाच अनेक जखमी प्राण्यांवरदेखील उपचार केले आहेत. तर जिल्ह्यामध्ये कुठेही रक्ताची गरज असेल तर त्या ठिकाणी अगदी तासाभराच्या कालावधीत गरजूंना रक्त पुरवण्याचे कार्यही राऊळ करत आहेत. पुरस्कार प्रदान प्रसंगी सर्प अभ्यासक निलीम कुमार खैरे, डॉ.संजय नाकाडे, देवदत्त शेळके, डॉ.श्रीधर कंदी, गणेश भाऊ मेहंदळे, डॉ. म्हस्के, आमदार संजय बांगर, सर्प अभ्यासक डॉ.कुणाल साळुंखे तसेच कार्यक्रमाचे आयोजक विजयराज पाटील हे उपस्थित होते. महेश राऊळ यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
