⚡वेंगुर्ला ता.११-: डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार १५ ऑक्टोबर व रविवार दि.१६ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला नगरवाचनालय या संस्थेतर्फे नविन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात कथा, कादंब-या, ललित, लेख, प्रवास वर्णने, धार्मिक पुस्तके, ऐतिहासिक, काव्य, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा विविध विषयांवरील पुस्तके मांडण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले.
