जिल्हा बँक कर्जाची १०० टक्के परतफेड करणाऱ्या संस्थाचा होणार गौरव;आमदार नितेश राणे, अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती
⚡वैभववाडी ता.१० संजय शेळके-: जिल्हा बँक कर्जाची १०० टक्के पूर्ण फेड केलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अभिनंदन करण्यासाठी सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील सुवर्णा मंगल कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक तथा आमदार नितेश राणे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे तसेच जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.
३० जून २०२२ अखेर जिल्हा बँक कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या विविध कार्यकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचे यावेळी अभिनंदन करण्यात येणार आहे. तसेच संस्था सक्षमीकरणाबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सभेस तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व सचिव यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँक शाखा वैभववाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
