गणित संबोध परीक्षेत नूतन विद्यालय कळणेचा 100% निकाल

⚡दोडामार्ग ता.१०-: ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत नूतन विद्यालय कळणे प्रशालेने घवघवीत यश मिळवले. इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100% लागला.त्यांना गणित विषय शिक्षक प्रसाद गोसावी व उमेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्राचार्य एम. डी. देसाई, संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page