सौरभ ताम्हणकर यांनी केले होते आयोजन
मालवण (प्रतिनिधी)
मालवण बंदर जेटी येथे नवरात्रोत्सवानिमित्त युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गरबा नृत्य कार्यक्रमास मालवणवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या निमित्ताने घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत समृद्धी संतोष तांडेल (कालिका) हिने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले
मालवण बंदर जेटी येथे नवरात्रोत्सवानिमित्त युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यावतीने गरबा नृत्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी मनसेनेदेखील कार्यक्रम आयोजित केला होता हे दोन्ही कार्यक्रम सुरळीत व्हावेत यासाठी सौरभ ताम्हणकर आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल यांनी पुढाकार घेत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ व मनसेने बंदर जेटीवर एकाच जागी सलग तीन दिवस गरबा नृत्याचे आयोजन करून मालवणची सांस्कृतिक परंपरा जोपासत ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही गरबा नृत्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळातर्फे आयोजित गरबा नृत्य कार्यक्रमाच्या निमित्ताने वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम – समृद्धी संतोष तांडेल (कालिका), द्वितीय- यज्ञा भूषण मयेकर, तृतीय- नित्या लीलाधर आचरेकर यांनी यश मिळविले. विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी निषय पालेकर, नुपूर तारी, राकेश सावंत, मॉन्टी तारी, कुणाल खानोलकर, गौरव लुडबे, फ्रान्सिस फर्नांडिस, संदीप पेडणेकर यांसह इतर उपस्थित होते.
