तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली पाहणी : खासदार विनायक राऊत यांनी दिला दहा लाख रुपयांचा निधी
⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव इंग्लिश स्कूलसाठी खासदार विनायक राऊत यांनी खासदार स्थानिक विकास निधी मधून १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. आज मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये भेट देत वर्ग खोली बांधण्याच्या जागेची पाहणी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
यावेळी संस्थेच्या वतीने सदर वर्ग खोलीच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन करा अशी सूचना संस्थेच्या वतीने करण्यात आली .यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी नवनिर्वाचित मुख्याध्यापक यानाही शुभेच्छा दिल्या व दीपावलीपर्यंत सदर वर्गखोलीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया असे आश्वासित केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री.एम.बी. फाले, शाळा संस्था खजिनदार श्री. नंदकिशोर राऊळ,शाळा समिती चेअरमन श्री.मनोहर राऊळ,श्री रितेश राऊळ, श्री प्रसाद नाईक,श्री महेंद्र पेडणेकर- संचालक महेंद्रा अकॅडमी, सावंतवाडी युवा सेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, विभाग प्रमुख सुनील गावडे, उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे ,शाखाप्रमुख निलेश शिरोडकर, माजी सरपंच बाबू गावडे आदी उपस्थित होते.
