मुंबई-गोवा महामार्गावर बाजारपेठ उभारुन स्थानिक भूमिपुत्रा व बचतगटांच्या उत्पादनांना स्थान द्यावे

*किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांची मागणी*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०१-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व महिलांचे दारिद्र्य दूर करून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषि मालाला, बचत गटांनी तयार केलेल्या कृषि प्रक्रिया उत्पादनाला योग्य बाजारभाव व बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६४ या महामार्गावर दुतर्फ़ा प्रत्येकी २५ किलोमीटर अंतरावर किमान १० स्टॉल उभारणी झाली पाहिजे. याच महामार्गावर बनविण्यात आलेल्या ब्रिज खाली खास बाजारपेठ उभारुन स्थानिक भूमिपुत्रांना व बचतगट निर्मित उत्पादनांना स्थान देण्यात यावे, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यानी प्रसिद्धि पत्रकद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page