सावंतवाडी-: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित युवकांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा दोन संशयित युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिल्हा न्यायलयाने दोन्ही संशयित युवकांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी जिल्हा सहाय्यक अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन संशयितांना ५ दिवसाची पोलीस कोठडी
