मल्लखांब स्पर्धेत यशस्वी कामगिरीबद्दल आ.वैभव नाईक यांनी केला हिमानी परब हीचा सत्कार…

*💫ओरोस दि.०१-:* जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारत देशाने सांघिक विजेतेपद पटकावले असून त्यामध्ये सहभागी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथील कु.हिमानी उत्तम परब हिने दोरीचा मल्लखांब मध्ये चार सुवर्णपदके व पुरलेल्या मल्लखांब मध्ये 2 कांस्यपदके मिळविली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा शिव छत्रपती पुरस्कार व मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कार तिला देण्यात आले आहेत. रविवारी कु.हिमानी परब हिने कणकवली विजयभवन येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक करत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

You cannot copy content of this page