*नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून सावंतवाडी ते शिर्डी जाणारी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ आज सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी आगार प्रमुख वैभव पडोळे, नगरसेवक, एस्टी कर्मचारी उपस्थित होते.
