*नगराध्यक्ष संजू परब यांचा आगार प्रमुख वैभव पडोळे यांना इशारा*
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी एस्टी डेपोचे वर्कशॉप इमारतीचे काम हे गेली ४ वर्ष सुरू असून, हे काम अगदी धिम्या गतीने सुरू आहे. या वर्कशॉपचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या . या बांधकामाची मुदत संपली असून देखील काम पूर्ण झाले नाही आहे. येत्या ७ दिवसात सर्व कामाची पूर्तता न केल्यास सावंतवाडी स्थानकातून एकही बस बाहेर पडू देणार नाही असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी आगार प्रमुख वैभव पडोळे यांना दिला आहे. तसेच नाही होतं काम तर संबंधित ठेकेदाराला तसे सांगायला सांगता अन्यथा आम्हाला उतरावे लागेल असा इशारा संजू परब यांनी अग्राह प्रमुख वैभव पोडळे यांनी दिली ते आज आपल्या पदाधिकारी पहाणी करताना सांगत होते
