रेडी येथील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेच्या पदाधिकाºयांनी गावातील विविध संवेदनशील विषयाकडे शासनाचे वेधले लक्ष…

*💫वेंगुर्ले दि.०१-:* भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेच्या पदाधिकाºयांनी गावातील विविध संवेदनशील विषयाकडे शासनाचे लक्ष वेधून कारवाई व्हावी याकरिता २६ जानेवारी २०२१ रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयांचे समोर केले होते. सदर उपोषणात, वाळू माफियांकडून करण्यात येणार बेकायदेशीर वाळू उपसा थांबवून कठोर कारवाई व्हावी, लीज मुक्त जमिनीतील शेतकºयांचा ७/१२ कोरा करावा, मायनिंग खाणीतील अनावश्यक गोड्या पाण्याचा उपसा तात्काळ थांबवावा, तसेच पाण्याअभावी शेतकºयांचे झालेली माड मरबाबत व मे. गोगटे मिनरल्स कंपनीने खनिजयुक्त चिखल शेतकºयांच्या खाजगी जमिनीत सोडल्याने नापीक झालेल्या शेतजमिनीची नुकसानीभरपाई मिळण्याबाबत मागण्या करण्यात आल्या होत्या संस्थेच्या वतीने करण्यात आलेला बेमुदत उपोषणातील सर्व विषय हे जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असताना, त्यांनी स्वत: हून याविषयावर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु तसे न केल्याने शेतकºयांना व ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ आली, ही गंभीरबाब सिंधुदुगार्तील महसूल विभागाच्या कर्तव्य तत्परतेवर नक्कीच शंखा उपस्थित केल्यासारखी आहे. तरीही उपोषणातील काही मुद्यांचे विषय जिल्हा खनिकर्म विभागाकडे दिले गेले. सदर उपोषणातील मुद्यांचे स्पष्टीकरण देण्याकरिता खनिकर्म विभागाच्यावतीने अजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शेतकरी व संस्थेच्या वतीने पाटील यांना दिनांक २७ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनावर २९ जानेवारी रोजी पाटील यांनी सदर उपोषणातील मुद्यांचे स्पष्टीकरण हे आपले सोईनुसार कंपनीला सहकार्य करण्याच्या उद्देशाने तीन वेळा आमच्या समक्ष बदलून देण्यात आले. रेडी येथील बºयाच शेतक?्यांच्या जमिनीत ८५१५ ह्या फेरफारप्रमाणे बी. म. गोगटे यांच्या नावाचा लिझ असल्याचा बोजा आहे. सदर व्यक्तीस देवाज्ञा होऊन २० वर्षे झाली, तरीही त्यांच्या नावाचा बेकायदेशीर बोजा कमी करण्याविषयी कायदेशीर अंमल झालेला नाही. या संबंधित अधिका?्यांना सदर विषयातील सर्व माहिती व कागदपत्र उपलब्ध असूनही हा बेकायदेशीर बोजा कमी करण्यासंदर्भात, तसेच शेतक?्यांची मागणी असूनही महसूल विभागाला लेखी सूचना करण्यास श्री.अजित पाटील हे बुद्धिपुरस्सर टाळाटाळ करीत आहेत व याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करून, माहिती घेऊन सांगतो अशी उत्तरे देऊन शेतकºयांची फसवणूक करून हेतुपुरस्सर विलंब करीत आहेत.

You cannot copy content of this page