*आंबोली येथील कबुलायदार गावकर शिष्टमंडळ कोकण आयुक्तांची घेणार भेट

आंबोली ग्रामस्थांनी दिली माहिती

*💫आंबोली दि.०१ विष्णू चव्हाण -:* आंबोली येथील कबुलायदार गावकर जमीनीचे सव्हेक्षण करून शासन वाटप करणार असताना अतिक्रमण होत आहे त्यांच्या विरोधात २६जानेवारीला उपोषण केले होते. गावकºयांना आतापर्यंत आश्वासन दिली, मात्र कारवाई झाली नाही म्हणून एक शिष्टमंडळ कोकण आयुक्त याची भेट घेणार आहे, अशी माहिती गावकरी विजय गावडे, सोमा गावडे, भूषण गावडे, अर्जुन गावडे, आदी ग्रामस्थांनी दिली. त्यांनी म्हटले की, सावंतवाडीचे तहसीलदार परप्रांतियांच्यां पाठिशी आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. गेले वर्षभर सुनावणी झाली कि पहाण्यासाठी त्यांच्या कडे धाव घेतात. एकतर्फी न्याय देत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. वर्ग एकच्या यादीत नावे असताना सुध्दा प्रशासन पाहण्यासाठी येत नाही, त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला. परप्रांतीय खोटया तक्रारी करून उपोषणे करतात. त्यांनाच पाठिशी घालण्याचे काम होत आहे. मागासवर्गीय समाजातील लोकांवर अन्याय होत आहे. याबाबत वरीष्ट पातळीवर चौकशी करून कारवाइ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page