*विकासकामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न

⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.यावेळी विविध विकास कामासंदर्भात लोकप्रतिनिधींशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदींसह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page