⚡वेंगुर्ले ता.०६-: वेंगुर्ले शहरातील श्री देव होळकर मंदिर नजीक भर वस्तीमध्ये आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासराला ठार मारले. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील श्री प्रफुल्ल सावंत हे शेतकरी यांनी आपली जनावरे चरवण्यासाठी घराच्या बाजूला बागेत सोडली होती. मध्ये पाऊस आल्याने ते घरी गेले मात्र पुन्हा येऊन बघतात तर वासराच्या गळ्याजवळ हल्ला झाल्याने मत्यवस्थेत पडलेले होते. या बाबत माहिती मिळताच योगेश गोवेकर, जयंत सावंत, ॲड. मनीष सातार्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वनविभागाला कळविले. काही वेळातच मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. तसेच नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
