मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे नगरपालिका मुख्याधिकाऱ्यासह तहसीलदारांचाही सत्कार

⚡मालवण ता.०६-: केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मातृत्व आधार
मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. श्री जिरगे यांच्याबरोबरच तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर व गंगाराम कोकरे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला

यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, अवि सामंत, बाळू अंधारी, मंगेश जावकर, महेश जावकर, दादा वाघ, आपा मराळ, ऐश्वर्य मांजरेकर, कमलेश कोचरेकर, सौ. राधिका मोंडकर, जयमाला मयेकर, सौ. दिक्षा गावकर, ममता तळगावकर, दिक्षा लुडबे आदी व इतर उपस्थित होते.

दरम्यान, मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे मालवण नगरपालिका मुख्याधिकारी श्री. जिरगे यांच्यासह तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर व गंगाराम कोकरे यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page