⚡कणकवली ता.०६-: वन्यजीव सप्ताह १ आक्टोबर ते ७ आक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे.या अनुषंगाने कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरस्वती हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह निमित्त सापांची ओळख व माहीतीपर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मार्गदर्शन वनविभाग सावंतवाडी,वनपरीक्षेत्र कणकवली, वनपरिमंडळ फोडा आणि सर्पमित्र इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
वन्यजीव संरक्षण आणि सापांची ओळख आणि सापांबद्दल गैरसमज याची माहीती देण्यात आली
उपस्थिती-परिमंडळ फोंडा अतुल खोत,शेगावे , सर्पमित्र इंडिया सभासद पंढरी वायगणकर, राजेश भोगले, मयूर राणे, मंगेश पाटील, सुदेश पाटील, रिद्देश तेली, विट्टल बिडये आणि नांदगाव हायस्कूलचे शिक्षक. कारेकर , नारकर , सावंत ,सौ. मोरये , सौ.राणे ,सौ. नलावडे आदी उपस्थित होते .
नांदगावात वन्यजीव सप्ताह निमित्त सापांची ओळख व माहीतीपर मार्गदर्शन
