पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात मंगळवारी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील हिंदू धर्म प्रेमिनी या दौडीत उस्फुर्तपणे सहभाग घेतला. सकाळी ७ वाजता येथील श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिर येथून दौडला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वजण पारंपारिक वेशभूशेत सहभागी झाले होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, श्री राजमाता जिजाऊनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ दिवस तुळजाभवानीचा जागर केला होता. जगदंबेच्या चरणी देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी मागितलेले वरदान, मागितलेले आशीर्वाद हे पुनररुपी मागण्याची प्रथा म्हणजेच दुर्गामाता दौड आहे.
मोर्येवाडा आळवाडी येथे दुर्गा देवीचे दर्शन घेऊन उभाबाजार मार्गे गांधींचौक दुर्गादेवी दर्शन घेऊन कट्टा कॉर्नर येथे दुर्गा देवीचे दर्शन घेणार घेण्यात आले. निमजगा दुर्गा देवीचे दर्शन घेऊन दौडची सांगता करण्यात आली. बांदा शहरात दोन तास ही दौड काढण्यात आली. संपूर्ण मार्गात दौडचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिलांनी दौडमध्ये सहभागी झालेल्या भारतमातेची ओटी भरून सांस्कृतिक परंपरा जपण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
या उपक्रमात शहरातील हिंदू बंधू भगिनी, हिंदू धर्म प्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो :-
बांदा येथे दौड मध्ये सहभागी झालेले हिंदू बांधव.
