शारदोत्सवाचे निमित्त; ग्रामस्थामधून समाधान
⚡सावंतवाडी ता.०३-: शारदोत्सवाच्या निमित्ताने सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर २ ला नवयुवक कला क्रिडा मंडळाकडून माता सरस्वतीची मुर्ती भेट देण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून ही मुर्ती मुख्याध्यापक दशरथ नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळ गेली पाच वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर आहे मंडळाने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेतला आहे. मंडळाच्या याच कार्याची दखल घेत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन च्या शिक्षक वर्ग तसेच पालकांकडून शाळेला माता सरस्वतीची मूर्ती भेट देण्याची विनंती केली होती मंडळाने शाळेची ही मागणी पूर्ण करताना शारदोत्सवाचे निमित्त साधून ही मूर्ती मुख्याध्यापक दशरथ नाईक यांच्याकडे सुपूर्त केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण भगत, मंडळाचे कार्यकर्ते विष्णू नाईक सत्यवान नाईक, सागर तेंडुलकर,सुशिल हिराप,आनंद देऊलकर, रुपेश हिराप याचबरोबर ग्रामस्थ चंद्रकांत मटकर, रामा हिराप उपस्थित होते.
मंडळाने यापूर्वीही या शाळेला डिजिटल वर्ग व कलर प्रिंटर स्वरूपात मदत केली आहे मंडळाने केलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.
