मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन
⚡मालवण ता.०२-: नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मालवण जेटी कस्टम ऑफिस समोर दिनांक ३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी महापुरुष प्रसन्न गरबा दांडिया सिझन-१ (गरबा दांडिया उत्सवाचे) आयोजन करण्यात आल्याची माहिती मालवण स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मालवणच्या युवाईची आयकॉन असलेल्या मालवण स्पोर्ट्स क्लबने यावर्षी प्रथमच महापुरुष प्रसन्न गरबा दांडिया सिझन-१ चे आयोजन केले आहे. हा उत्सव सर्वांसाठी खुला असून या उत्सवास उत्कृष्ट दांडिया गरबा नृत्य तसेच आकर्षक वेशभूषेला रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने मालवण जेटी कस्टम ऑफिस समोर भव्य रंगमंच उभारण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मालवण स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी केले आहे.
