बांदा शहरात ४ रोजी दुर्गामाता दौड

मंगेश पाटील यांची माहिती

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात मंगळवार दिनांक ४ रोजी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ७ वाजता ही दौड येथील श्री देवी भूमिका मंदिर येथून सुरु होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, श्री राजमाता जिजाऊनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ दिवस तुळजाभवानीचा जागर केला होता. जगदंबेच्या चरणी देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी मागितलेले वरदान, मागितलेले आशीर्वाद हे पुनररुपी मागण्याची प्रथा म्हणजेच दुर्गामाता दौड आहे. या उपक्रमात सर्व धर्म व राष्ट्रप्रेमिनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page