विद्यार्थ्यांना पळविण्याचा प्रकारची शहानिशा करा

पालकांची पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्याकडे मागणी

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात शाळकरी विद्यार्थ्याला पाळविण्याचा प्रकार घडल्याने शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शहरातील जागृत पालकांनी आज बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांची भेट घेत या प्रकरणाची योग्य शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पालकांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी हेमंत दाभोलकर, हेमंत मोर्ये, दत्ताराम नाटेकर, शैलेश केसरकर, गौरी बांदेकर यांच्यासह पालक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मुलाच्या अपहरणाच्या घटनेने लहान मुलांवर परिणाम झाला असून मुले भीतीच्या छायेखाली आहेत. याचा विपरीत परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ शकतो. सदरची घटना ही अफ़वा आहे की मराठी शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न याचा शोध पोलिसांनी घ्यावा.
फोटो :-
बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांना निवेदन देताना बांदा शहरातील पालक. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page