शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ : पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या , अपहरण करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्गच्या सीमेवर असणाऱ्या गोवा, कर्नाटक राज्य असून, त्यामुळे चोऱ्या करणारे, अपहरण करणारे पळून जातात. त्यामुळे तेथील पोलिसांसोबत आंतरराज्य समन्वय साधला पाहिजे. असे मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सोनुर्ली माऊली मंदिरात चोरी झाली असून, चोरटे सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये दिसत असूनही त्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश येत नाही आहे. शहरातील मोती तलावात परप्रांतीय रात्रीच्या वेळी मासेमारी करत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, व्यवसायिक, फिरते व्यापारी असून, त्यांची नोंद फोटोंसह पोलिस स्थानकात ठेवावी अशी मागणी देखील त्यानी यावेळी केली आहे. तसेच बांदा येथे घडलेला अपहरण करण्याचा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशी मागणी देखील त्यानी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.
