सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा १४ फेब्रुवारी रोजी भव्य मेळावा….

*💫मालवण दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा भव्य मेळावा रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०. ३० वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यामध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीपात्र, इ. १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण, उच्च शिक्षण पदवी प्राप्त, शिक्षकेतर कर्मचारी पाल्य यांचा विद्यार्थी गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रत्येक तालुक्यातून एक लिपिक व एक चतुर्थ श्रेणी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करून पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच संघटनेच्या सुरुवातीला ज्या शिक्षकेतर बांधवांनी संघटनेत मोठे योगदान दिले त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.  या मेळाव्यास उद्घाटक म्हणून आरवली संस्थानचे क्षेत्राधिकारी मिनानाथ महाराज (आजोबा) यांच्या हस्ते होणार असून  अध्यक्ष म्हणून कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. चेतन पाटील, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगवड, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष व्ही. आर. डगरे, सिंधुदुर्ग जिल्हा अद्यापक संघाचे माजी सचिव उमेश सुखी, सिंधुदुर्ग शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष आनंद लोके, रेडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तथा सदस्या गायत्री सातोसकर, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अद्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष अनिल राणे, उपाध्यक्ष सुहास देसाई व गोपाळ चौकेकर, कार्याध्यक्ष बी. बी. चव्हाण, सहसचिव प्रदीप सावंत व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे सचिव गजानन नानचे, उपाध्यक्ष धनश्री गावडे, राज्यप्रतिनिधी पांडुरंग दळवी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page