साटेली येथील मंदार धर्णे या क्रिकेटपटूचे निधन…

*💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* साटेली येथील मंदार धर्णे (३६) या क्रिकेटपटूचे रविवारी राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. मंदार हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. क्रिकेट खेळाची खूप आवड होती त्याच्या क्रीडा कौशल्याने त्याने कितीतरी सामने आपल्या नावावर करून घेतले होते. साटेली येथील संघातून क्रिकेटचे नेतृत्व करीत असे या खेळातून एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख मिळविली होती.शालेय जीवनात ही त्याने विविध क्रीडा स्पर्धा प्रकारात भाग घेत एक उत्तम खेळाडू म्हणून आपले नाव कमावले होते.त्यातच अल्पशा आजारने त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली. रविवारी असणारे आजूबाजूच्या परिसरातील क्रिकेट सामने रद्द करण्यात आले.त्याच्या पश्चात आई ,तीन भाऊ असा परिवार आहे.आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

You cannot copy content of this page