गोव्यातील “मिशन रॅबिज” संस्थेने नगरपालिकेच्या सहकार्याने केले लसीकरण
⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील भटक्या कुत्र्याचे रॅबीज लसीकरण करण्यासाठी गोव्यातील “मिशन रॅबिज”या संस्थेने नगरपालिके च्या सहकार्याने बुधवारी सायंकाळ पासून मोहीम हाती घेतली. असून तब्बल तीस ते चाळीस कुत्र्यांना ही लस देण्यात आली आहे.
या मोहिमेत संस्थेच्या आठ ते दहा स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता.
