लोरे येथे साकवाच्या लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी केल्या लंपास

⚡कणकवली ता.२८-: लोरे नं. १ येथील गव्हाळी वहाळ येथे असणाऱ्या लोखंडी साकवाच्या १० हजार रुपये किमतीच्या ७ लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या आहेत. ही घटना २० सप्टेंबर रोजी उघड झाली.

याबाबतची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग कणकवली येथिल कनिष्ठ अभियंता वर्षाराणी जाधव यांनी नोंदविली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लोरे गव्हाळी वहाळावर मार्च १९८७ मध्ये लोखंडी साकव बांधला होता. त्यानंतर हा साकव जिल्हा परिषद उपविभागाकडे २८ मे १९८७ रोजी देखभाल व दुरुस्ती कामी हस्तांतरीत केला होता. या साकवाच्या लोंखडी साहित्याची चोरी झाल्याची माहिती ग्रामसेवक ऋतुराज कदम यांनी सौ. जाधव यांना दिली. त्यानंतर शाखा अभियंता श्री. सुतार यांच्यासह लोरेत जाऊन सरपंच अजय रावराणे यांच्यासह घटनास्थळी पाहणी करण्यात आली. यावेळी साकवावरच्या ७ लोखंडी प्लेट आढळल्या नाहीत. प्लेटस चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत

You cannot copy content of this page