⚡कणकवली ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कणकवली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला १२३ रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले, रक्तदान शिबिरामध्ये महिलांचाहि सहभाग उत्स्फूर्त होता.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले यावेळी गोटया सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, समीर नलावड़े, भाजपा मंडळ अध्यक्ष मिलींद मेस्त्री, संतोष कानडे, मनोज रावराणे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री,
अन्ना कोदे,दिलीप तळेकर,राजन चिके,गणेश तळगावकर, ससंदिप सावंत,नितिन पाड़ावे,सोनू सावंत, आनंद घाड़ी, सुभाष मालंडकर संतोष पूजारे, समीर प्रभुगावकर, स्वप्निल चिंदरकर,सर्वेश दळवी,बबलू सावंत,पंढरी वायंगणकर, सागर राणें उपस्थित होते.
सिंधुदुर्ग रक्तपेढ़ीचे डॉ. अमित आवळे,डॉ. आरती महात्मे,प्रांजलि परब,भारती भोसले,सुरेश डोंगरे, दीपक भाटवाडेकर उपस्थित होते.
