औषध विक्रेत्यांकडून संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तूची मदत

⚡कणकवली ता.२६-: जागतिक फार्मासिस्ट दिनी कणकवली तालुक्यातील महिला औषध विक्रेत्यांनी कोणतेही
सेलिब्रेशन न करता संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू देत सामाजिक बांधली जपली.

याशिवाय आश्रमातील मुलांसोबत केक कापून फार्मासिस्ट डे अनोख्या
पद्धतीने साजरा केला. औषध विक्रेत्यांनी आश्रमातील व्यक्तींसमवेत काही वेळ
चर्चा करत त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य देखील फुलवले.
25 सप्टेंबर हा जागतिक फार्मसी डे म्हणून साजरा करण्यात येतो याच दिवशी तालुक्यातील मेडिकलधारकांनी पणदूर
येथील संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.
यावेळी आयुष मेडिकलच्या स्मिता उचले– गोवेकर, भोगले मेडिकलच्या नीलिमा भोगले-सावंत, ईशान मेडिकलच्या सोनल साळगावकर,
वि.के.डिस्ट्रीब्युटर्सच्या मृदूला घळसासी, योगेश मेडिकलच्या
सिया रेडेकर, यश डिस्ट्रीब्युटर्सच्या विनीता बुचडे, कोरगावकर मेडिकलच्या शीतल कोरगावकर,धानजी मेडिकलच्या वैष्णवी धानजी, प्रचिती मेडिकलच्या प्रितम घाडीगावकर आदी उपस्थित होत्या.

)

You cannot copy content of this page