आजारी स्नेहल घाडीगांवकरला माजी आरोग्य सचिव चंद्रकांत घाडीगांवकर यांच्याकडून मदतीचा हात

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिनी पिडीत महिलेला मदत करत स्री शक्तीचा केला सन्मान

⚡मालवण ता.२६-: त्रिंबक घाडीवाडी येथील आजारी स्नेहल घाडीगांवकर यांना उपचारासाठी मदतीचा हात देत माजी आरोग्य सचिव मुंबई यांनी रोख दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका पिडीत महिलेला आर्थिक मदतीचा हात देत घाडी यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
नव-याला झालेल्या अपघाताचा धक्का घेऊन स्नेहल या एप्रिल महिन्यात कोमात गेल्या होत्या.त्यांना
इस्पितळात दाखल करण्यात आले होते.गरीब परिस्थितीमुळे त्यांना उपचाराचा खर्च परवडत नव्हता

उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज,विभाग सिंधुदूर्ग कडून आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. तसेच क्षत्रिय घाडीगांवकर सेवा समाज मुंबई विभाग सिंधुदुर्ग कडून आपत्कालीन मदत देण्यात आली होती. उपचाराला प्रतिसाद देत त्यांची प्रकृती काही प्रमाणात सुधारत आहे. सध्या त्या घरी उपचार घेत आहेत.मात्र उपचारासाठी येणाऱ्या खर्चा मुळे त्यांना मदतीची गरज होती. ही बाब ओळखून आचरा येथील रहिवासी आणि मुंबई मंत्रालय सेवानिवृत्त आरोग्य विभाग सचिव चंद्रकांत घाडी यांनी तातडीने दहा हजाराचा चेक स्नेहल घाडीगांवकर यांना सुपूर्द करत आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत अर्जुन बापर्डेकर आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page