मुले होत आहेत व्यसनी;मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंके यांना निवेदन
⚡सावंतवाडी ता.२६-: तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू, मटका याचबरोबर अमली पदार्थांचे प्रमाण वाढले असून, यामध्ये मुले व्यसनाच्या आहारी जाऊन वाया जात आहेत. लहान मुलांना वडीलधारी माणसांकडून खाऊसाठी देण्यात येणाऱ्या पैशांचा वापर ती मुल अमली पदार्थ, दारू तसेच मटका लावणे यासाठी करत आहेत. या व्यसनांमुळे अनेक ठिकाणी आत्महत्या पण होत असून, याबाबत योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ रोहिणी साळुंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सद्य स्थितीत ऑनलाईन मटका झाला असल्याने चिठ्ठ्या मिळत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. गोवा बनावटीची दारू याच रस्त्यावरून जाते परतू, त्यावर कणकवलीत कारवाई होते. याचा अर्थ काय? असा सवाल उपस्थित करत या सगळ्या प्रक्रियेत कोणी सामील असेल तर त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यानी यावेळी केली. तसेच आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे अवैद्य धंदे होत असतील तर त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री संतोष भैरवकर कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मंदार नाईक कुणाल किनळेकर बाबल गावडे दीपक गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत कौस्तुभ नाईक सुरेंद्र कोठावळे प्रवीण गवस आबा चीपकर मनोज कांबळी विष्णू वस्कर वैभव धुरी मंदार सुभेदार आदी उपस्थित होते
