रोटरी क्लब मालवणतर्फे श्रवणदोष चिकित्सा शिबीर संपन्न

⚡मालवण ता.२५-: रोटरी क्लब मालवण तर्फे शालेय मुलांसाठी श्रवणदोष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कन्याशाळेतील तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ऑडिओमेट्रि मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.

रोटरी क्लब माहीम व मैत्रेयी महिला मंडळ ट्रस्ट च्या अध्यक्षा रो. डॉ. लतिका बांदेकर यांनी हि तपासणी केली. दोष आढळलेल्या मुलांना योग्य तो सल्ला देण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष रो. महादेव पाटकर यांनी संस्थेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका राळकर यांनी श्रवणदोष तपासणीसाठी प्रशालेची निवड केल्या बद्दल रोटरी क्लबचे आभार मानले. यावेळी रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रतन पांगे, सचिव अभय कदम, डॉ. लीना लिमये, महेश काळसेकर, सुहास ओरसकर, रमाकांत वाक्कर, ऋषी पेणकर, संदेश पवार, महादेव पाटकर उपस्थित होते. यावेळी रो. डॉ. लतिका बांदेकर यांनी मालवण मधील सर्व शालेय मुलांची ऑडिओमेटरी तपासणी करण्याची तयारी दर्शवली आहे.

You cannot copy content of this page