फोंडाघाट येथे कबड्डी शिबिराला प्रतिसाद

⚡कणकवली ता.२५-: फोंडाघाट येथे फोंडाघाट एज्युकेशन संस्था आणि फोंडा पंचक्रोशी व आजाद स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने कबड्डी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणाला राष्ट्रीय स्तरावर खेळलेले कोच हेमंत सावंत होते. सदर प्रशिक्षण १८ ते २५ सप्टेंबरपर्यंत घेतले गेले.या शिबिरासाठी आजाद स्पोर्ट्स क्लब व फोंडा पंचक्रोशी संघातील खेळाडूंनी मेहनत घेतली.समारोप प्रसंगी ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी जि.प.सभापती संदेश पटेल संस्था अध्यक्ष सुभाष सावंत,मुख्याध्यापक सावंत , दीपक इस्वलकर,भूपेश राणे,अमित चव्हाण,अमित पारकर,महेश भोगले आदी उपस्थित होते.
आनंदी आयुष्यासाठी पैसापेक्षा सुदृढ शरीर गरजेचे असते. ते खेळामूळे प्राप्त होते.ग्रामीण खेळाच्या उन्नती साठी सैनिक फेडरेशन च्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.असे आश्वासन सुधीर सावंत यांनी दिले.
यावेळी संदेश पटेल,सुभाष सावंत भूपेश राणे आदींनी मुलांना मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page