काही ठिकाणी उभ शेतच केलय फस्त;कृषी विभागाकडून पहाणी
⚡मालवण ता.२५-: आचरा धुपकाटा येथे तीळ शेतीवर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून अळींनी तीळ पिकाची संपूर्ण पाने खाऊन फस्त केल्याने शेतकरयांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा प्रादुर्भाव लगतच्या भुईमूग शेतीवरही जाणवू लागल्याने भुईमूग शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.याबाबत कृषी विभागाकडून पहाणी करुन बुरशीनाशक औषधांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आचरा परीसरात धुपकाटा येथील वरकस जमिनीवर भुईमूग शेती बरोबरच तीळाचेही आंतरपीक घेतले जाते.मात्र काही शेतकरयांनी प्रथमच तीन चार गुंठे भागावर काळा तीळाची पेरणी केली होती. मात्र मोठ्या प्रमाणात अळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पाने खाऊन अळींनी उभे पीक फस्त केले आहे. तीळानंतर आता भुईमूग शेतीवरही काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. याबाबत आचरा कृषी सहाय्यक सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी तातडीने पहाणी करत उंट अळींचा प्रादुर्भाव असल्याचे सांगितले. तसेच या अळींच्या नियंत्रणाकरिता क्लोरोपायरीफॉस वीस इसी दोन मिली प्रति लिटर किंवा लॅमडा साईलोथ्रीन पाच इसी 0.5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करण्याचे आवाहन केले आहे.भुईमूग पिकावरील प्रादुर्भावा बाबत बोलताना शिंदे यांनी सांगितले की भुईमुंग पिकावर टिक्का नावाचा बुरशी जन्य रोग आढळून येत आहे वेळीच उपाय योजना न केल्यास उत्पादना मध्ये चाळीस ते पन्नास टक्के घट येऊ शकते हा आजार सरकोस्पेरा स्पेसिज ही बुरशी टिक्का रोग होण्यास कारणीभूत असते. या रोगाची लक्षणे
पानावर ठिपके पडणे हे याचे मुख्य लक्षण आहे. हे ठिपके सुरुवातीला तपकिरी रंगाचे आणि विविध आकाराचे असतात. उशिरा येणारे ठिपके हे पूर्ण वर्तुळाकर आकाराचे आणि गर्द काळे रंगाचे असतात.
प्रादुर्भाव वाढल्यावर ठिपक्यांची संख्या देखील वाढते. नंतर हे सर्व ठिपके एकमेकांत मिसळून सर्व पान करपून गेल्यासारखे दिसते.असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याचा प्रादुर्भाव
हवामाना मध्ये आद्रता जास्त असल्यास, टिक्का रोग मोठ्या प्रमाणात फैलावतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टिक्का प्रतिबंधक भुईमूग जातीची लागवड करणे. टिक्का प्रतिबंधक भुईमूग जाती त्यामधे फुले उन्नती, फुले भारती, टी अे जी – २४ या जातीचा वापर करावा पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बुरशीनाशक वापरून बीज प्रक्रिया करावी.किंवा जैविक बुरशी नाशक ५ ग्रॅम ट्रायकोडरमा प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. जैविक नियंत्रणा मधे varticelium lecanii किंवा ट्राईकोड्रमा विरिडी याची पाचटक्के द्रावनाची फवारनी करावी
रासायनिक नियंत्रना साठी आपल्या परिसरात सहज उपलब्ध होनारे
मॅनकोझेब(m 45) अधिक कार्बनदडेन्ज़िम बुरशीनाशकाची 30 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात फवारणी करण्याचे कृषी सहाय्यक शिंदे यांनी सांगितले आहे.
