वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा पेट्रोलची गंभीर टंचाई…

परुळेत पेट्रोल उपलब्ध असल्याने नागरिकांतून समाधान..

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यात सोमवार 4 एप्रिल रोजी पेट्रोल पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठराविक दिवसानंतर पुन्हा पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याने वाहनधारकांची तारांबळ होत आहे. वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील पेट्रोलपंपावर सोमवारी दुपारी 12.30 वा. पासून पेट्रोलचा साठा संपल्याने एकच समस्या निर्माण झाली. तर डिझेल, सीएनजि पुरवठा सुरु होता.दरम्यान रविवारी सकाळी पेट्रोल पुरवठा सुरळीत होईल, असे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. परुळे येथे काही प्रमाणात पेट्रोल पुरवठा करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.उभादांडा श्री देव मानसीश्वर पेट्रोलपम्प येथेही सोमवारी पूर्ण दिवस पेट्रोल पुरवठा पूर्ण दिवस बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.दरम्यान संबंधित कंपनीने मुबलक प्रमाणात पेट्रोलसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे.दरम्यान वेंगुर्ला भटवाडी येथे पेट्रोलपम्प वर सीएनजी साठी गर्दी होत आहे. रस्त्यावर वाहने रांगेत उभी असल्याने ट्राफिक समस्या निर्माण होत असून याचा वाहनधारकांना त्रास होत असून मुख्य मार्गांवरील होणारी वाहतूक समस्या पाहता 2 लाईनमध्ये ही व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page