दत्त प्रतिष्ठानच्या नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२५-: तारकर्ली येथील दत्त प्रतिष्ठान वायरी बांध यांच्यावतीने नेत्र तपासणी शिबिर आणि हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर वायरी बांध येथील प्रफुल्ल मांजरेकर यांच्या गजानन रिसॉर्ट येथे संपन्न झाले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १२५ गरजूंची नेत्र तपासणी तर ११० जणांची हिमोग्लोबिन व थायरॉईड साठी रक्त तपासणी करण्यात आली.

यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेब कम्युनिटी आय केअर सेंटर मिरज संचालित, विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे डॉ.संदीप कदम आणि त्यांचे सहकारी यांनी मोफत नेत्र तपासणी करून त्यावरती काहीना डोळ्याचे ड्रॉप तर काहींना मोफत चष्मा देण्यात आले. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था कुडाळ यांच्यावतीने हिमोग्लोबिन आणि थायरॉईड याबाबतची तपासणी डॉ. प्रशांत जाधव, डॉ. शुभम परब, डॉ. आशिष परब, डॉ. कुणाल चव्हाण, डॉ. प्रदीप पवार यांनी केली. यामध्ये ११० जणांनी रक्त तपासणी केली.

यावेळी वैभव सावंत ,प्रफुल्ल मांजरेकर ,अजिंक्य परकर ,नाना नाईक ,जयवंत सावंत, अजय हीर्लेकर मकरंद चोपडेकर ,विशाल नाटळकर, दत्ता सावंत ,संतोष झाड ,शितल मयेकर, सिद्धाली झाड ,प्रज्योत आंबेडकर, प्रशांत गोसावी ,नितेश मिठबावकर यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली. यावेळी सर्व डॉक्टर आणि मान्यवर यांचे शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थ आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page