सावंतवाडी,दि.२५ सप्टेंबर (प्रतिनिधी)
रोटरी क्लब कायमच सेवाभावी वृत्तीने काम करत असून आज ३७० लाभार्थी नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत अशी माहिती रोटरीच्या अध्यक्षा रो. विनया बाड यांनी दिली. पुढील काळात मुलांच्या व्यक्तीमत्व विकास उपक्रम आणि अपंगांना जयपूर फूट वाटप करण्याचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास उपक्रम हाती घेतला जाणार आहे असे रो विनया बाड यांनी सांगितले तर जयपूर फूट वाटप करण्याचा मनोदय रो राजेश घाटवळ यांनी व्यक्त केला.
यावेळी रो राजेश घाटवळ,रो साईप्रसाद हवालदार, अँड जायबा धुरी यांनी सहकार्य केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
रोटरी क्लब, व्हिजन लॅब, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, मुस्लिम वेल्फेअर संघटना यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप कार्यक्रम करण्यात आला होता.
रो. विनया बाड म्हणाल्या,रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या डोळे तपासणी शिबिरा अंतर्गत व्हिजन लॅब तर्फे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुमारे ३७० लाभार्थीना चष्मा वाटप करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक सेवाभावी संस्थेनी आपले योगदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली त्या सर्वांचे स्वागत आणि आभार मानण्यात आले.
यावेळी अध्यक्षा रो विनया बाड, सेक्रेटरी रो प्रमोद भागवत, रो.राजेश घाटवळ ,रो साईप्रसाद हवालदार, रो.सुधीर नाईक,इव्हेंट चेअरमन रो.जायबा धुरी,रो जिगजिंनी,रो करंदीकर,रो सचिन देशमुख,रोटरॅक्ट पृथ्वी, त्यांची टीम तसेच पत्रकार संघटनेचे अभिमन्यू लोंढे,हरिश्चंद्र पवार, मुस्लिम वेलफेअर अध्यक्ष सोहेब बेग,हिदायततुल्ला खान,सलिम मुल्ला, रिजवान पटेल, मोहसीन मुल्ला,तबजीर बेग,तुशीद्दीन शेख आदी उपस्थित होते.या सर्वांचे सेक्रेटरी रो प्रमोद भागवत यांनी आभार मानले.
फोटो
रोटरी क्लबच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो.विनया बाड,रो राजेश घाटवळ,रो करंदीकर,व अन्य
