⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-: नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सावंतवाडी येथील सेंट्रल उर्दू हायस्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकविला आहे.
आठवीत शिकणारी विद्यार्थीनी कु. श्रेया प्रेमनाथ मांजरेकर व कु. आर्या आपा कापडी या विद्यार्थीनीनी ‘होम सेक्यूरीटी सिस्टीम’ हि प्रतिकृती तयार केली होती. अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य माध्यमिक गटामध्ये विज्ञान शिक्षक श्री नितीन धामापूरकर यांनी तयार केलेली ‘सोप करुया विज्ञान गणित’ या प्रतिकृतिला दुसरा क्रमांक मिळाला. या यशस्वी विद्यार्थ्यांना उमेश राऊळ व नितीन धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
