नगरसेवक सुशांत नाईक यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी केली चर्चा
⚡कणकवली ता.२४-: एकीकडे नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना चोरट्यानीही आपले हातपाय पसरण्यात सुरुवात केली आहे.कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर असलेल्या क्रिस्टल रेसिडेन्सी बिल्डींग मधील तब्बल दहा फ्लॅट एकाच वेळी शनिवारी पहाटेच्या सुमारास फोडून चोरट्याने धाडसी चोरी केली.
दरम्यान बिल्डिंग मधील फ्लॅट फोडत असताना इतर लोक राहत असलेल्या फ्लॅट ना बाहेरून कडी घालून घेत चोरट्यानी सावधगिरी बाळगली. जे दहा फ्लॅट फोडले त्यामध्ये दरवाज्याचा कडी – कोयडा तोडून चोरट्यानी फ्लॅटमध्ये प्रवेश केला . मात्र ही बाब काहींच्या लक्षात येतात फ्लॅट मधील काही लोकांनी आरडाओरड केली. यादरम्यान त्यांनी आणि येथे राहत असलेल्या या बिल्डिंग मधील एका फ्लॅट धारकाने या बिल्डिंग खाली येत या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान चोरट्यानी तिथे असलेल्या विटा या नागरिकांवर भिरकावत हल्ला केला. तसेच चोरटे पळून जात असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न तेथील नागरिकांनी केला असता चोरट्यांच्या हातात असलेली कटावणी घेऊन हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान ज्या ठिकाणी फ्लॅट फोडले गेले त्या ठिकाणी अनेक उर्वरित फ्लॅट ना बाहेरून कडी लावली होती. जे फ्लॅट फोडले त्यामध्ये रहिवासी आत नसल्याने बंद फ्लॅट हेरून चोरट्याने हा डल्ला मारला. मात्र ज्यावेळी चोरट्यांना प्रतिकार करण्यास काही पुढे सरसावले तेव्हा त्यांनी हल्ला करण्यासाठी केलेला प्रयत्न हा ही बाब गंभीर असून, याबाबत तात्काळ उपाय योजना होण्याची गरज आहे. तसेच हे चोरटे पळून जात असताना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाले आहेत. ही चोरी करत असताना तीन चोरटे होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळतात नगरसेवक व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी चर्चा केली. तसेच याबाबत पोलिसांना देखील माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबतची अधिक माहिती पोलीस घेत आहेत पोलिसांकडून संबंधित फ्लॅट मालकांना संपर्क सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
