भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी ता.२४: भारत मातेचे समर्पित सुपुत्र जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन आज सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, रवि मडगावकर,मनोज नाईक,राजू बेग,आनंद नेवगी, प्रमोद गावडे, हनुमंत पेडणेकर दिपाली भालेकर,दिलीप भालेकर, सविता टोपले केतन आजगावकर, अमित परब, विनोद सावंत ,सत्यवान बांदेकर, अनिल सावंत पिंट्या सावंत, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

