मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस परीक्षेत पोईप येथील सौ. इ. द. वर्दम हायस्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
या परीक्षेत प्रशालेची कु. विणा राजन खोत हिने जनरल यादीत तालुक्यातून तिसरा क्रमांक, कु. दिया भाऊ तांडेल हिने एसबीसी यादीत जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आणि कु. खुशी जितेंद्र परब हिने इ.डब्लू.एस यादीत जिल्ह्यातून आठवा क्रमांक प्राप्त करून गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. अनिलभाई कांदळकर सर्व संस्थाचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एन. कुंभार, बाह्य परीक्षा विभाग प्रमुख श्री. कारंडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.
