परराज्यातील. बोटी आणून व्यवसाय करणाऱ्यांना केवळ नोटिसा बजावल्या जात

बंदर अधिकाऱ्यांवर जलक्रीडा व्यावसायिकांचा प्रश्नांचा भडिमार;संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी
परराज्यातील बोटी आणून मालवणच्या समुद्रात जलक्रीडा व्यवसाय करणाऱ्यांकडे मालवणचा बंदर विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप करीत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जलक्रीडा व्यवसायिकांनी आज मालवणच्या बंदर विभागाला धडक देत बंदर निरीक्षक श्री रणजित पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला यावेळी परराज्यातून बोटी आणणाऱ्या व्यावसायिकावर नोटीस बजावण्या पलीकडे कोणतीच कारवाई करत नसल्याने बंदर विभागाचे त्या व्यावसायिकास अभय आहे काय असा सवाल उपस्थित करून संबंधित व्यावसायिकावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला

दरम्यान जलक्रीडा व्यवसायिकांनी बंदर निरीक्षकांना धारेवर धरताच संबंधित व्यावसायिकाला बंदर निरीक्षकांनी कार्यालयात पाचारण करताच पर्यटन व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी व संबंधित व्यावसायिक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी संबंधित व्यावसायिकास बंदर विभागाने नोटीस बजावण्यात आली आहे

यावेळी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, महासंघाच्या जलक्रीडा व्यावसायिक आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र परुळेकर, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा अन्वेषा आचरेकर, मनोज मेथर, रुपेश प्रभू, मनोज खोबरेकर, मिलिंद झाड मीनल परब, संतोष परब आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी बंदर विभागाच्या कार्यालयासमोर परराज्यातील बोटी द्वारे जलक्रीडा व्यवसाय केला जात आहे. बंदर विभागाच्या डोळ्यादेखत अनधिकृतपणे जलक्रीडा होत असतानाही बंदर विभाग कारवाई करत नाही. बंदर विभागाने डोळे बंद केले आहेत का ? इतर व्यावसायिक सदर व्यावसायिक बंदर विभागास आव्हान देत आहे. संबंधित व्यवसायिकाकडून कमी दराने व्यवसाय केला जात असल्याने इतर व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. परराज्यातील बोटीचे कोणते कागदपत्र त्या व्यावसायिकाने बंदर विभागास सादर केले आहेत ? इतर व्यावसायिक अधिकृत व्यवसाय करण्यासाठी सर्व कागदपत्र पूर्ण करत असताना एका व्यावसायिकाला अभय का ? असे सवाल यावेळी अन्वेषा आचरेकर व राजेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केले.

यावेळी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी संबंधित व्यावसायिकाने ऑनलाइन पद्धतीने कागदपत्र सादर केले आहेत, व्यवसाय अनधिकृत आढळल्यास कारवाई करू असे सांगितले. संबंधित व्यावसायिकाकडून समुद्रात जलक्रीडा सुरू असून ते तात्काळ बंद करावेत आणि कारवाई कारवाई करावी अशी मागणी यावेळी अन्वेषा आचरेकर यांनी केल्यावर बंदर निरीक्षक पाटील यांनी आपले कर्मचारी किनाऱ्यावर पाठवून संबंधित व्यवसायिकास जलक्रीडा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्या व्यावसायिकाने जलक्रीडा बंद करून बंदर कार्यालय गाठले.

संबंधित व्यावसायिक बंदर कार्यालयात दाखल झाल्यावर पर्यटन व्यावसायिक महासंघाचे पदाधिकारी व त्या व्यावसायिकात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी संबंधित व्यावसायिकाने आपली बाजू मांडली

यावेळी उपस्थित जलक्रीडा व्यावसायिकांनी त्या व्यावसायिकाने सादर केलेल्या कागपत्रांची माहिती ही माहितीच्या अधिकारात आम्हाला द्यावी, एकाने बाहेरून बोटी आणून त्यावर कारवाई होणार नसेल तर सर्वांनाच अशाप्रकारे बाहेरून बोटी आणण्याची परवानगी बंदर विभाग देणार का असे प्रश्न यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. तसेच सर्व व्यवसायिकांना एका दराने व्यवसाय करण्यासाठी बंदर विभागाने एक खिडकी योजना राबवावी अशी मागणी अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली. यावर उद्या दि. २४ सप्टेंबर रोजी एक खिडकी होण्यासाठी जलक्रीडा व्यावसायिकांची बैठक घेण्यात येईल असे बंदर निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

You cannot copy content of this page