सावंतवाडीत घोषणाबाजी करीत फटाके फोडले;न्यायालयाच्या निकालानंतर शिवसैनिकांत आनंदोत्सव
⚡सावंतवाडी ता.२३-: ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजीपार्क मैदान मिळावे यासाठी सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला दणका देत ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला असून, शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. याचा आनंद आज निकालानंतर सावंतवाडी येथील शिवसेना शाखेसमोर जोरदार घोषणाबाजी करत आणि फटाके लाऊन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा संपर्क अरुण भाई दुधवडकर ,जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा संघटक जानवी सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, बाळा गावडे, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर,शब्बीर मणियार गुणाजी गावडे,अपर्णा कोठावळे रश्मी माळवदे,श्रुतिका दळवी,आदी उपस्थित होते.
