प्रदेश प्रवक्ते माधवराव भांडारी उदया कणकवलीत

जिल्ह्यातील बुद्धीजीवी वर्गाशी साधणार संवाद

⚡कणकवली ता.२३-: सिंधुदूर्ग जिल्ह्याचे सुपुत्र,प्रदेशाचे प्रवक्ते आणि ‘मोदी @ 20’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक माधवराव भांडारी हे शनिवार 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येत असून सायंकाळी ठीक 5 वाजता कणकवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड हॉटेलच्या सभागृहात जिल्ह्यातील डॉक्टर,इंजिनिअर,वकील,सि ए, प्राध्यापक, उद्योजक यांच्याशी संवाद साधणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व,त्यांची धोरणे,त्यांचे देश विकासाचे व्हिजन आदी बाबींचा विस्तृतपणे उहापोह करणारे ‘मोदी @ 20’ हे पुस्तक अलीकडेच मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.माधवराव भांडारी हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
देशभर सध्या ‘सेवा पंधरवडा अभियान’ सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ‘मोदी @20’ या पुस्तकातील भागाच्या अनुषंगाने बुद्धिजीवी मंडळींशी संवाद साधला जात आहे.
माधवराव भांडारी आपल्या जिल्ह्यातील प्रज्ञावंत नागरिकांशी संवाद साधणार आहेत.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,आमदार नितेश राणे,ॲड.अजित गोगटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या संवाद सत्राचे संचलन भाजपा प्रज्ञावंत आघाडीचे डॉ. मिलिंद कुलकर्णी करणार आहेत.
तरी जिल्ह्यातील प्रज्ञावंत मंडळींनी या संवाद सत्रासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत व अभियान संयोजक प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page