आरसे महालचे होणार नूतनीकरण

आ वैभव नाईक यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ;दोन कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर

मालवण दि प्रतिनिधी
एकेकाळी मालवणच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या प्रसिद्ध आरसे महाल या शासकीय विश्राम गृहाची गेल्या काही वर्षांत झालेली पडझड लक्षात घेऊन मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या इमारतीच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी ९७ लाख रुपयाचा निधी मंजूर केल्यानंतर या नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला.

मालवण येथील आरसेमहाल शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी आम. वैभव नाईक यांनी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मंजुरी साठी पाठपुरावा केला होता. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आरसे महाल, शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी बजेट मधून २ कोटी ९७ लाख रु.निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून आजपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देत कामाची पाहणी करत कामाच्या दर्जाबाबत ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, सन्मेष परब, दीपक देसाई, महेश जावकर, किरण वाळके व ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page