आचरे बंदर येथे नवरात्रोत्सवा निमित्त भजन आणि महिलांसाठी खास फुगडी स्पर्धेचे आयोजन.

⚡मालवण ता.२२-: आचरा बंदर येथील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त भजन आणि महिलांसाठी फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुगडी स्पर्धा दिनांक २९ सप्टेंबर रोजी तर भजन स्पर्धा १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे जगदीश पांगे यांनी दिली.

दिनांक २६ सप्टेंबर पासून नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने फुगडी आणि भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच दांडिया नृत्य ही सादर केले जाणार असल्याने दांडिया ग्रुपनी संपर्क साधावा . या स्पर्धेसाठी इच्छुक असलेल्या भजन मंडळांनी तसेच फुगडी मंडळांनी अनिल मोबाईल नंबर ८४११९८३८९४, श्री रामदास मोबाइल नंबर ९४२०३०८४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page