रुपाली पेडणेकर मुंबई विद्यापिठात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२१-: उभादांडा-सुखटणवाडी येथील रुपाली राजन पेडणेकर हिने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मॅकेनिकल इंजिनियरींग विषयात (सीजीपीओ ९.८७) प्रथम क्रमांक मिळविला. रुपाली पेडणेकर हिने फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी रत्नागिरी या महाविद्यालयात शिक्षण घेतले असून उभादांडा शाळा नं.२ येथे तिचे प्राथमिक शिक्षण झाले आहे.

त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page