आरपीडीचा श्रेयस केनवडेकर एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे- १ यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) मध्ये आरपीडीचा श्रेयस श्रीपाद केनवडेकर शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे- १ यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २०२१-२२ चे आयोजन इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १५०००० च्या आत आहे तेच विद्यार्थी सदर परीक्षा देऊ शकतात आणि परीक्षा गुणवत्ता यादीत निवड झाली तर बारावी पर्यंत प्रत्येक महिन्याला १००० रू.प्रमाणे स्कॉलरशिप मिळते. सदर गुणवत्ता यादीत आरपीडीचा श्रेयस केनवडेकर याची निवड झाली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे व मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page